top of page

मराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन सदस्यत्व

नोंदणी करा!

मला ही मदत हवी आहे
मी खालील प्रशिक्षण घेऊ इच्छितो/इच्छिते

धन्यवाद!

पुन्हा मराठी साम्राज्य

संकल्पना 

शिवछत्रपतींनी निर्माण केलेले स्वराज्य, बाजीराव पेशव्यांनी वाढवले. उत्तरेकडे आपली घोडी वळवून थेट दिल्लीला धडक मारली. हे करत असताना माळवा, गुजरात, इंदोर, दिल्ली या ठिकाणी मराठी सरदारांनी आपले पाय घट्ट रोवले. याला मराठा मंडळ असे म्हटले जाते. यामुळे, मराठी सत्तेचा दबदबा, दरारा आणि पकड भारतभर राहिली. 

 

इंग्रजांनी केलेल्या पराभवानंतर मराठेशाहीचा अस्त झाला. 

 

आज पुन्हा, एकदा विचारातून आपण आधुनिक मराठी मंडळाची स्थापना करू शकतो. पुन्हा, देशभर मराठी माणसांचे ठसे उमटले पाहिजेत. मराठी माणूस विविध क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च पातळीवर गेला पाहिजे. देशभरातील मराठी माणसांना एकत्र करून, त्यांना त्यांच्या क्षेत्रात सर्वोत्तम होण्यासाठी मदत करून, देशभरातील सर्व मराठी माणूस एक करून, आधुनिक मराठी साम्राज्याचा पाया रचला जाऊ शकतो. 

 

यासाठी, एका नियोजनाने काम करण्याची गरज आहे. 

१. यूपीएससी द्वारे राष्ट्रीय प्रशासकीय सेवांमध्ये मराठी तरुणांना अधिक संख्येने जावेत

२. सर्वोत्तम राष्ट्रीय संस्थांमध्ये जसे आयआयएम, आयआयटी, यामध्ये मराठी तरुण जावेत

३. परदेशी सर्वोत्तम मराठी संस्थांमध्ये मराठी तरुण जावेत 

४.  शासकीय सेवा आणि सैन्याद्वारे मराठी तरुण राष्ट्रीय सेवांमध्ये जावेत 

५. उद्योजक बनून मराठी माणसांचे उद्योग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावेत आणि वाढावेत. 

 

यासाठी: 

१. मराठी विद्यार्थ्यांना इंग्रजी, परदेशी भाषा यांचे प्रशिक्षण देणे 

२. स्पर्धा परीक्षा, यूपीएससी, IELTS, परदेशी भाषा या विषयांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे

३. यूपीएससी, जेईई एडव्हान्स यासाठी शिष्यवृत्ती 

४. कला आणि क्रीडा क्षेत्रातील मराठी तरुणांसाठी शिष्यवृत्ती 

५. मराठी उद्योजकांसाठी मराठी व्हेंचर फंड 

६. मराठी माणसांसाठी मराठी फंड  

७. मराठी साहित्य, नाट्य, सिनेमा, भाषा, शाळा या विषयांवर सातत्याने काम 

८. मराठी ज्ञानभाषा व्हावी यासाठी प्रयत्न 

 

काम विशाल आहे, पण सर्वांनी मिळून एकत्र येऊन केले तर मराठी माणसांसाठी एक कायमस्वरूपी संस्थात्मक कार्य उभे राहू शकेल. 

image.png
कथा लेखन स्पर्धा (1).png
Prabodhak Logo.png
Subscribe Form

धन्यवाद!

bottom of page